आधीच्या प्रतिसादात कुणी हे सुचवले असल्यास क्षमस्व. सगळे वाचायला वेळ मिळाला नाही.
सकाळचे सँडविच असे करून पाहा. दुपारी जेवायची गरज लागणार नाही.
तीन अंडी उकडून थंड झाल्यावर, एका अंड्याचा बलक आणि तिन्ही अंड्यांतल्या पांढऱ्या भागाचे बारीक काप करावेत. थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यावी. थोडीशी ताजी (फ्रेशली ग्राउंड) मिरपूड, चवीप्रमाणे मीठ आणि २ चमचे फॅटफ्री मायोनीज घालून सगळे एकत्र करावे आणि व्हीट ब्रेडच्या दोन तुकड्यांमध्ये भरून खावे.
रात्री अंडी उकडून ठेवल्यास, सकाळी हे करायला अजिबात वेळ लागत नाही. आणि भरपूर प्रथिने असल्याने बराच वेळ दुसरे काही खाण्याची गरज भासत नाही.
आवडत असल्यास यात बारीक चिरलेल्या मिरच्या, टोमॅटो किंवा अन्य मसाले टाकायला हरकत नाही.
-प्रभावित