बमला वाटतं, कि 'शिवश्री'च्या या लेखातून त्यांनी आपल्या मनोगतावर एक चांगला विषयच मांडला आहे. तो म्हणजे " धर्म परिवर्तन आणि (त्यामुळे)  होणारा विकास".

धर्म परिवर्तनातून आपला विकास घडेल, बाहेरचा (इतर)समाज आपल्याला त्यांच्या बरोबरीला बसवेल असे एक स्वप्न या लेखातून दिसते आहे. कदाचित त्यांना तसा अनुभवही आला असेल. म्हणूनच त्यांनी ही बातमी मनोगतावर सांगितली आणि बरोबर एक स्वप्नसुद्धा पहायला लावले! त्यांच्याशी कोण कितपत सहमत होतील हा प्रश्न निराळा आहे.

मूळ प्रश्न आहे कि खरोखरच या धर्मपरिवर्तनामुळे विकास झाला का? कोणाचा झाला ? आणि तो कसा ? विकास म्हणजे फक्त आर्थिकच नाही तर, सामाजिक, बौद्धीक, मानसिक आणि कौटुंबिक सुद्धा !!

या छोट्याश्या बातमीमधून त्यांनी हा सर्व विकास होइल हे स्वप्न दाखवले तर आहे, पण आता त्या बरोबर त्याच्या समर्थनार्थ त्यांनी आता आपल्याला असा खरोखर विकास झाला का? याची काही माहिती दिली तर फार बरे होइल. प. पू. बाबासाहेबांनी ५० वर्षांपूर्वी धर्मपरिवर्तन केले होते. त्यांच्या बरोबर लाखो लोकांनीपण केले होते. त्यामुळे आता पर्यंत पुष्कळ लोकांचा विकास झाला असेल. त्यामुळे त्यांनी या  लोकांनी आपल्या "यशस्वी जीवन गाथा / Success Stories" जर सांगितल्या तर बाकीच्या लोकांना पण त्या मार्गावरून चालता येईल. मला वाटतं , कि, शिवश्री यांनी या जर गोष्टी लोकांसमोर ठेवल्या तर आपोआपच टिकाकारांची बोलती बंद होईल.

तसेच याची दुसरी बाजू पण लक्षात घेतली पाहीजे. सर्व हिंदू समाजासमोर (थोडी नगण्य उदाहरणे सोडली तर ),  दलितांची फक्त ढासळलेलीच प्रतिमा आहे. आणि याच्यामुळेच धर्मपरिवर्तनासारखा अति संवेदनशील विषय टिंगल- टवाळीचा/ विनोदाचा विषय होतो. आणि त्याची काळीकुट्ट बाजूच फक्त लोकांसमोर येते.  म्हणून साठी सुध्धा या यशस्वी जीवनगाथा सांगितल्या पाहीजेत.

यावर आपण, (हिंदू समाज म्हणून ) काय केलं आहे, (व्यक्तिगत नव्हे, तर तात्त्विक पातळीवर) आणि केलं पाहीजे , हे जरी लिहीले तरी हा विषय अशा चर्चेला येणार नाही.  

हे माझे व्यक्तिगत मत आहे. यावर चर्चा करायला मला आवडेल.

माझ्या छोट्याश्या अनुभवावरून सांगतो, एक कुटुंब  (बाकीच्या हिंदू धर्मातील, विशेषत: ब्राह्मण आणि मराठा) , जर आर्थिकदृष्ट्या (आणि म्हणून सामाजिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या) संपन्न झाले तर,  ते आपल्या बाकीच्या नातेवाईकांना आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न करतात, प्रसंगी स्वत:ला तोशीश पडली तरी सहन करून !! पण दुर्दैवाने मात्र एक दलित कुटुंब जर असे संपन्न झाले तर ते, आपल्याच इतर नातेवाइकांपासून दूर पळतात, त्यांना सोडतात. (अर्थात, यातही  सन्माननीय अपवाद आहेतच ) आणि म्हणून बाकीचे मात्र त्या यशस्वी वाटेवरून चालू शकत नाहीत. तसं जर नसतं तर आज चित्र काही वेगळचं असतं.  शिक्षण, चांगले संस्कार (आपापल्या घरातीलच), मदतीची वृत्ती, सांभाळून रहायचा स्वभाव, वाटेल तसे कष्ट करायची तयारी  यामुळे बाकीचे लोकांचा विकास झाला आणि आजही होतो आहे. या बाकीच्या सर्व लोकांनी संपन्न होण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्या नातेवाईक मंडळी, समाज, सरकार यांनी मदत केली. अशा एकमेकांच्या मदतीनेच आपण वर आलो आहोत.

( या बाकीच्या समाजातही जे लोक हा पूर्वानुभव विसरले, ते हळुहळू परत खालती चालले आहेत. पण त्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. )

मात्र हा यशाचा मार्ग दलित लोकांना का पचला नाही, का रुळला नाही, का दिसलाच नाही या  आणि अश्या प्रश्नात समस्येचे मूळ आहे , असे मला वाटते.

गरिबी आणि अडाणीपणा सर्व हिंदू लोकांनी पाहीला आहे. काहींच्या २ पिढ्या आधी गरीब होत्या आणि काहींच्या आजही आहेत. पण ते कारण होऊ शकत नाही.  कारण त्याच्याशी झुंज देत देतच  बाकीचे सर्व लोक संपन्नावस्थेला पोहोचले आहेत.

अशा अजूनही बऱ्याच बाजू  / मुद्दे आहेत. कृपया त्यावर सुशिक्षित, सुजाणपणे चर्चा करू या. म्हणजे त्यातून खरी बाजू समजेल.