ह्या सर्व प्रतिसाद - उपप्रतिसाद ह्यातून हे अर्थ निघाला आहे व मला वाटतं की सर्वानं हे मान्य असावेत,

१ . बाहेरील व्यक्ती (अमराठी ) ह्यांनी येथे यावं पण ज्या ठीकाणी राहत असतील तेथील भाषेचा वापर करावा.

२. जर ते नवीन असतील तर त्यांनी येथील सामान्य जनतेचा मान राखून मराठी भाषा शिकावी.

३. संपूर्ण नाही पण काही अंशीतरी महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्यामुळे मराठी भाषेचा तोटा होणार नाही ह्याची काळजी घ्यावी ... जर तुम्हाला मराठी शिकण्यास अडचण येत असेल तर कमीत कमी आपल्या अपत्यांना तर मराठी ही शिकवावीच. 

 अर्थातच महाराष्ट्रामध्ये राहून मराठीची जपवणूक करावी.