वैदिक व हिंदू मध्ये काय फरक आहे मला माहीत नाही आहे. तेव्हा जरा स्पष्ट करा. बाकी २३ वे आणि २४ वे तिर्थंकर यां मधे सुद्ध हजारो वर्षांचा काळ उलटून गेला असे जैन लोक म्हणतात असाच काळ प्रत्येक तिर्थंकरामध्ये आहे असे मानले जाते पण पुरावा नाही.
वेदामध्ये वृषभदेवांचा उल्लेख आहे पण ते व जैन वृषभदेव दोन्ही एकच असावेत असे वाटत नाही. त्यांची ओळख श्री रामचंद्र ह्यांचे आजोबा अशी देखील आहे पण ह्याला ही आधार मिळत नाही आहे कारण हिंदू ग्रंथामध्ये ह्यांची नोंद मिळत नाही पण जैन ग्रंथामध्ये आहे.