वैदिक व हिंदू मध्ये काय फरक आहे मला माहीत नाही आहे. तेव्हा जरा स्पष्ट करा.
>> हिंदू हे परकियांनी सिंधूच्या पूर्वेला रहाणाऱ्या लोकांना दिले. वैदीक म्हणजे वेद-प्रामाण्य मानतात ते. सरकार-दरबारी सुद्धा वैदीक असा शब्द वापरात नाहीत. शिवश्री जे हिंदूंना शिव्या देत असतात ते खरे त्यांना वैदीक म्हणायच असतं. हिंदू धर्मात वैदीक बहूसंख्य, पण चातुर्वण्य, मनूस्मृती वैगेरे मुळे वैदीक धर्म बदनाम झालेला. आता अशा ह्या बदनाम लोकांबरोबर का रहायचं? आणि अल्पसंख्यांकत्वाचा फ़ायदा अशा दुहेरी लाभांकरिता सगळ्या पंथांना आपले वेगळेपण सिद्ध करायचे आहे. जैन संस्था कैक वर्षांपासून अल्पसंख्याकत्वा करिता लढा देत आहेत. दक्षीणेकडील राज्यांत त्यांना पूर्वीच मान्यता मिळाली होती, आता केंद्र सरकारनी सुद्धा दिली आहे. संघाचा ह्या सगळ्यांना हिंदू सूत्रात बांधण्याचा प्रयत्न आहे म्हणून भाजप राज्ये तुम्ही उल्लेख केला तसे कायदे करत असतात (म.प्र. राजस्थानी पूर्वी हे प्रयत्न केले आहेत).
बाकी २३ वे आणि २४ वे तिर्थंकर यां मधे सुद्ध हजारो वर्षांचा काळ उलटून गेला असे जैन लोक म्हणतात असाच काळ प्रत्येक तिर्थंकरामध्ये आहे असे मानले जाते पण पुरावा नाही.
>> खरं आहे, पुरावा तर माझ्याकडेही नाही
वेदामध्ये वृषभदेवांचा उल्लेख आहे पण ते व जैन वृषभदेव दोन्ही एकच असावेत असे वाटत नाही. त्यांची ओळख श्री रामचंद्र ह्यांचे आजोबा अशी देखील आहे पण ह्याला ही आधार मिळत नाही
>> काही तिर्थंकर ईश्वाकू घराण्याचे होते हे मी सुद्धा वाचलं होतं खरं पण ते वृषभदेव की अजून कोण नक्की माहीत नाही, वाचून सांगेन.
कारण हिंदू ग्रंथामध्ये ह्यांची नोंद मिळत नाही पण जैन ग्रंथामध्ये आहे.
>> हम्म, असं बरच काय काय आहे दोघांमध्ये, जैन लोक परशूरामाला, सहस्त्रार्जूनाने मारले म्हणतात, वैदीक नेमकं उलट. वैदीक लोक आस्तिकानी जनमेजयाच ह्रदय परिवर्तन केलं म्हणतात, जैन म्हणतात जनमेजयाला युद्धात लोळविला.