महाराष्ट्रात मजुरांची कमतरता आहे!
असे वाटत नाही. महाराष्ट्रात आळस जास्त आहे. कामांमध्ये हलके-उच्च प्रतीचे अशी वर्गवारी जास्त आहे. शेतीची कामे करायला कामगार मिळत नाहीत कारण बहुसंख्यांचा ओढा शहरांकडे असतो. गौरी-गणपतीच्या काळात मुंबईहून जास्तीच्या एस्ट्या सोडाव्या लागतात. रेल्वेचे आरक्षण मिळत नाही. एवढे कोंकणाचे मनुष्यबळ मुंबईच्या गिरण्यांतून, कारखान्यांतून पगारी कामगार म्हणून राबत असते. कोंकणांत ज्यांची वडिलोपार्जित, अनेक एकर जमीन असते तेही ती जमीन न पिकविता, मुंबईत राहतात आणि 'आमचे कोंकण' ह्या विषयाचे गोडवे गातात. कोंकणातल्या कित्येक जमीनी, व्यवसाय अमराठी हाती जात आहेत.