हॉटेलमधील स्वागतिका वगैरे यांना इंग्रजी आणि 'दोडे दोडे' हिन्दी येत होते पण हॉटेलच्या बाहेर मात्र मोठीच समस्या. आम्हाला शाळेत शिकवलं होतं, "क्रियापद हा वाक्याचा प्राण असतो." त्या नियमानुसार पुढचे काही दिवस आम्ही आणि त्रिवेन्द्रम मधील माणसे यांचा संवाद 'निष्प्राण' व्हायचा!  


लेख उत्तम झाला आहे. आवडला. 'दोडे-दोडे':):) मुळं मला माझ्या विनू सीरियॅक ह्या प्रेमळ मल्याळी मित्राचा किस्सा आठवला.

त्याची थोडी-बहुत ओळख झाल्यावर एके दिवशी काही मित्रांसोबत त्याच्या खोलीत गेल्यावर त्यानं मला सहज विचारलं 'भट, गाना गायेगा ग्या?". ह्याला काय झालं अचानक? पुन्हा त्याचे 'भट, गाना गायेगा ग्या?" हॉस्टेलात आमची गायनमंडळी प्रसिद्ध होती. पण आमची धाव हॉस्टेलातल्या कडुनिंबाच्या 'चौपाल'पर्यंत, पारापर्यंत. पण म्हणून हे काय 'गाना-गायेगा-क्या'. माझ्या एका बुब्बुळात हसू आणि दुसऱ्या बुब्बुळात "अबे मैं भांड-मिरासी हूं क्या बे?" असा प्रश्न. एवढ्यात रूममेट मॅत्त्यू वर्गीस हसला आणि म्हणाला, "भट तुम समज़े नई. ओ पूच रहा है काना कायेगा क्या?" यानंतर क्षणासाठी शांतता पसरली.

आणि त्यानंतर आम्ही सगळेच एकही शब्द न बोलता पागलासारखे खिदी-खिदी-खिदी-खिदी हसायला लागलो. पोटावर हात धरून-धरून हसलो. हसून-हसून अगदी रडकुंडीला आलो. शेवटी थकलो आणि मग मेसमध्ये जेवायला गेलो.