इथे डोळ्यांवर कातडं ओढून घेतलेल्या कुणाला जर डुकरांपेक्षा वाईट जीवन काय असतं हे पाहायचं असेल तर लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्या या आत्मचरित्रातील काही भाग जरूर वाचावे.

हे सांगून काही उपयोग आहे का? उचल्या न वाचलेले लोक तसे कमीच मिळतील. त्यातून 'अरेरे! वाचून कित्ती कित्ती वाईट वाटलं म्हणून सांगू..." असे सांगणारे सगळेच भेटतील.

शिवश्री आणि शिवधर्माबद्दल प्रेम नाही. ते इथे येऊन दोन-चार वाक्ये फेकून जातात पण त्या निमित्ताने इतरांचे खरे रंग दिसतात हे ही नसे थोडके.

तुझ्या लिहिण्याचा उपयोग इतकाच की शिवश्री, साळुंखे, प्रियालीच्या पुढे हे लोक आता साती लावतील इतकंच.

(सातीशी संवाद संपला)

जाउ द्या म्हणा आरक्षणातून डिग्री पदरात पाडून घेता येते, संस्कार नाही हेच खर.

संस्कार ही विशिष्ट गटाची मक्तेदारी आहे वाटतं? मला वाटत होतं की शिकून विचार करण्याचा, राहण्याचा स्तर उंचावला की मनुष्याच्या गरजा, निकडी, राहणीमान बदलत जातं, आचार-विचार बदलतात. संस्कारांसाठी ते तसं एका माणसाचं बदलून सहसा उपयोग नसतो. संपूर्ण समाजाच बदललं तर संस्कृती निर्माण होते आणि संस्कार घडतात.

तसेही इतर उच्चवर्णीय भ्रष्टाचारी नेत्यांचे संस्कार कुठले असावेत? की तेही त्यांनी मान्यांकडून शिकून घेतलेले असावेत?

भेळ खाऊन कागद फेकणारे, रस्त्यावर थुंकणारे, बाजारांत घाण करणारे, रोग्यांना नाडणारे, ट्रेनमध्ये इतरांना ढकलून धक्काबुक्की करणारे, जागा अडवून भजने म्हणणारे, लोकांना व्यवसायात नाडणारे सर्वच जण आरक्षणातून डिग्री घेऊन आलेले असावेत नाही का?