जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे ब्राह्मणवादाच्या विरोधातून, ब्राह्मणवादाला वर्चस्व देण्याच्या प्रयत्नांतून जन्माला आले असे म्हणतात. सुरवातीला जैन धर्म स्वीकारणारे प्रामुख्याने वैश्य होते आणि जैन धर्म हा प्रामुख्याने शहरी होता. याउलट बौद्ध धर्माचा प्रसार हा क्षत्रियांत अधिक झाला. जैन आणि बौद्ध तत्वज्ञानांवर औपनिषदिक विचारांचा गहिरा प्रभाव आहे. पण त्यामुळे हे धर्म हिंदू धर्माचाच हिस्सा आहे असे आम्ही म्हणू शकत नाही.1
वर्गीकरणच करायचे झाल्यास, जैन आणि बौद्ध धर्म हे औपनिषदिक धर्म समजावेत
असे मला वाटते. बहुंसख्य बौद्ध आणि असंख्य जैन बांधव त्यांच्या धर्माचे
अस्तित्व हिंदू धर्मापासून वेगळे आहे असेच मानतात. त्यामुळे, शेवटी ही गोष्ट, निर्णय त्या-त्या
धर्माच्या बहुसंख्येवर सोडावी असे वाटते.
जाता-जाता, शनींनी चुकून वृषभनाथ लिहिले आहे. ऋषभनाथ हवे.
चित्तरंजन
अवांतर:
1. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माची अनेक तत्त्वे यहुदी धर्मासारखीच असली तरी हे
तिन्ही धर्म वेगळे आहेत. इस्लाममध्ये मात्र ख्रिश्चनांना आणि ज्यूंना
अहले-किताब (थोडक्यात, एका पुस्तकाला मानणारे) म्हणतात. मुसलमाना
पुरुषाला ख्रिश्चन किंवा ज्यू स्त्रीशी लग्न करायचे असल्यास तिचे
धर्मपरिवर्तन करुन घेणे गरजेचे नाही.