ज्ञानेश्वरी संपूर्ण स्वरूपात 'विकिपीडिया बुक्स' या संलग्न प्रकल्पात 'ज्ञानेश्वरी ' येथे उपलब्ध आहे.आता दुवा व्यवस्थित केला आहे. तरीसुद्धा खालील नमूद केल्या पैकी कोणतेही योगदान स्वागतार्ह आहे.
१)विकिबुक्स वरील ज्ञानेश्वरीचे संपादन,दुरुस्ती इत्यादी
२)मुख्य विकिपीडिया वर (जिथे तुम्ही भेट दिली) माहितीपर लेख.
३) आपण खालील तीन प्रकारातील कोणतेही लेखन जसेच्या तसे मनोगत किंवा इतर स्त्रोतातून विकिपीडियावर उतरवू शकतो.
अ) कॉपीराइट कालावधी संपलेले कोणतेही लेखन. माझ्या माहितीनुसार प्रताधिकार साधारणता लेखकाच्या मृत्यू नंतर ६० वर्षाने संपतो. जर लेखन निनावी असेल तर तो प्रकाशन वर्षानंतर ६० वर्षाने संपतो.
ब) लेखकाच्या पूर्वपरवानगीने.
क) 'फेअर युजच्या तरतुदी अंतर्गत संपूर्ण लेखन वापरता येत नाही, परंतु समीक्षण इत्यादी करिता मर्यादित प्रमाणात दाखले देता येतात.
उपरोल्लेखित सर्व प्रकारात स्रोतांची माहिती देणे सौजन्यपूर्ण समजले जाते. चु.भु.द्या̱̱. घ्या.
आपला
विकिकर