मीराताई, अनुभव व लेख माहितीपूर्ण आहे. ओघवता आहे.
ते ट्वेंटी > त्वंदी असा प्रवास करत करत माझ्या कानापर्यंत पोचेतो नंदी झाले होते!
अशी काही वाक्यांनी वर्णन सजीव झाले आहे.
ती म्हणजे मुलांसाठी खाऊ किंवा छोटीशी का होईना पण एखादी वस्तू. ती मात्र यावेळी नव्हती!!
' !! ' दोन चिन्हांनी जो हवा तो परिणाम साधता आला नाही असे वाटते, लेखिकेला त्या वस्तू नाहीत याचा आनंद की खेद वाटतो त्याचा उलघडा या चिन्हांमुळे झाला नाही. 'चला सुटका झाली' असा अर्थ अपेक्षित नसावा. खाऊ नाही याचा खेद अपेक्षित असावा असे वाटले.
वर्णनात काही इंग्रजी शब्द टाळता आले असते पण ते मराठी प्रतिशब्दांपेक्षा अधिक प्रचलित आहेत म्हणून आपण वापरले असतील असे वाटते. आपले भाषाप्रभुत्व पाहाता आपल्याला सर्व मराठी शब्द उपयोगात आणणे अवघड नाही.
चू. भू. द्या. घ्या