खरंतर हा सिनेमाचा परिणाम. जे राजकारणी याचा आधार घेत असतील त्यांना याची जाणीव आधी नाही का झाली? आज एकदम सगळं का आठवत? असो मला हा प्रसिद्धीचा एक मार्ग वाटतो.
मुद्दा असा आहे कि समाजसुधारणेची सुरवात स्वतःपासून होते. त्याला कोणत्या आंदोलनाची गरज नाही. वाहतुकीचे नियम तोडणे हा पुण्यातल्या वाहतुकीचा एकमेव नियमच आहे जणू आणि त्यावर असे गांधीगिरीचे प्रकार करून प्रसिद्धी मिळवणे सोपे आहे. मला प्रश्न आहे कि याच लोकांपैकी किती जणांनी घरी जाता जाता हेच नियम मोडले असतील.
भारतात अलीकडे वाजपेयी हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे जे थोडे फार लोकांना मान्य होते. पण भूतकाळात रमणाऱ्या आम्हा भारतीयांना गांधी या गोळीने अजून सुद्धा उतारा मिळतो. मग आम्हाला नवीन संशोधनाची काय गरज. नवीन काही असेल तर ते गोऱ्यांकडून येईलच ना?
आज सुद्धा या देशाचे तारणहार म्हणून गांधी या आडनावाला लोकांची जास्त पसंती आहे.
राहून राहून विचार मनात येतो मोहनदासांचे आडनाव मोदी असते तर आज आपल्याला इतर गांधींची गरज होती का? की हेच लोक मोदी या आडनावाने पुढे आले असते?