सुरवातीला जैन धर्म स्वीकारणारे प्रामुख्याने वैश्य होते आणि जैन धर्म हा प्रामुख्याने शहरी होता.
माफ़ करा ही वस्तूस्थिती नाही, जैन धर्मिय आणि त्यांचे तिर्थंकर बहूतांशी क्षत्रिय होते.
याउलट बौद्ध धर्माचा प्रसार हा क्षत्रियांत अधिक झाला. जैन आणि बौद्ध तत्वज्ञानांवर औपनिषदिक विचारांचा गहिरा प्रभाव आहे.
वरिल वाक्यातून बौद्ध तत्त्वज्ञान वगळावयास हवे कारण बुद्ध-दर्शन आत्मा आणि ब्रम्ह मानत नाही. मी कोण? ही चर्चा उपनिषदात अधिक तर दु:ख का? ही बुद्ध-दर्शनात अधिक.
पण त्यामुळे हे धर्म हिंदू धर्माचाच हिस्सा आहे असे आम्ही म्हणू शकत नाही.1
'हे वैदीक धर्माचा हिस्सा आहे असे आम्ही म्हणू शकत नाही' असे लिहावयास हवे. हिंदू ज्यांनी आपल्याला नाव दिले ते जैन, बुद्ध असा फ़रक अजूनही करित नाहीत.
जाता-जाता, शनींनी चुकून वृषभनाथ लिहिले आहे. ऋषभनाथ हवे.
सहमत. ऋषभ बरोबर आहे.
अवांतर:
1. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माची अनेक तत्त्वे यहुदी धर्मासारखीच असली तरी हे तिन्ही धर्म वेगळे आहेत. इस्लाममध्ये मात्र ख्रिश्चनांना आणि ज्यूंना अहले-किताब (थोडक्यात, एका पुस्तकाला मानणारे) म्हणतात. मुसलमाना पुरुषाला ख्रिश्चन किंवा ज्यू स्त्रीशी लग्न करायचे असल्यास तिचे धर्मपरिवर्तन करुन घेणे गरजेचे नाही.
असहमत. हे तिनही धर्म एकच आहेत आणि ते हिब्रू पुस्तक तोराह (ओल्ड टेस्ट्यामेंट) वर आधारित आहेत. ख्रिस्तीलोक अब्राहम-ऍडम-मोझेस पासून ते ख्रिस्ता पर्यंत सगळ्यांना मसिह (मसेंजर) मानतात. याशिवाय काही ख्रिस्ताला देवपूत्र मानतात. मुसलमान इब्राहीम-आदम-मुसा-ईसा असे उच्चार करतात आणि या सगळ्यांना मसिह मानतात; मोहंमदाला शेवटचा मसिह मानतात. ख्रिस्ताला देवपूत्र मानत नाहीत. तोराह आणि बायबल मधे नको ते बदल करून ती पुस्तके अपवित्र केल्याचा आरोप मुसलमान ज्यू आणि ख्रिती लोकांवर लावतात. पण याच बरोबर आपण तिघे एकाच देवाची उपासना करतो अशी इस्लामची मान्यता आहे. याशिवाय, काफ़िर म्हणजे 'न मानणारा'. मध्यपूर्वेकडील पेगन्स (पाच निसर्गदेवता ) मानणाऱ्यांना उद्देशून हा शब्द वापरत, नंतर कोणत्याही ईतर श्रद्धा असणाऱ्यांकरिता तो वापरला जाऊ लागला.