शुभेच्छा या केवळ आपल्या मनातील इतरांप्रती असणाऱ्या सद्भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे, केवळ शुभेच्छा दिल्याने सण आनंदाचा असेल असे नाही किंवा केवळ गुड मॉर्निंग म्हटल्याने सकाळ चांगलीच असेल असे नाही.तसे असते तर परीक्षेत कोणीच नापास झाला नसता कारण प्रत्येकजण प्रत्येकाला बेस्ट ऑफ लक म्हणतच असतो. मात्र तरीही एकमेकांशी संपर्क वाढविण्याचे साधन व मैत्री वाढविण्याचे निमित्त म्हणून मला अशा शुभेच्छा महत्त्वाच्या वाटतात. माझ्यातर्फे सर्वांना दसरा-दिवाळीच्या शुभेच्छा.

अवधूत.