चित्रपट खूपच आवडला अगदी ऑकरला जाऊन ते मिळवण्याच्या लायकीचाही वाटला. सर्वांची कामे ही खूप आवडली. पण हा (लगे रहो..) चित्रपट आत्ता येण्याचे कारण काहीतरी वेगळेच वाटतय...

विचार करा, ह्याचा नायक "संजय दत्त" ज्याचा कळत-न-कळत (कारण काहीही असो) पण १२ मार्च १९९३ च्या मुंबई स्फोटाशी संबंध आहे, त्या खटल्यातील तो आरोपी आहे आणि त्या खटल्याचे निकाल दररोज जाहीर होत आहे.

मुन्नाभाई हा खऱ्या जीवनात आत्ता न्यायालयाच्या खऱ्या न्यायाच्या भितीत वावरत आहे. कदाचित आपल्याला माझे हे विचार (तर्कट?) सार्कॅस्टीक वाटतील, पण या मुन्नाभाईला आता गांधीजी आठवतात, मुंबईत हा गांधीजयंतीला पदयात्रा काढतो.

आता उद्या याला गुन्हेगार म्हणून न्यायालयाने ठरवले, की शिक्षा होण्याच्या आधीच, राजकारणी आणि मुन्नाभाईने वेडे झालेले "पब्लिक" आ"रडा" ओ"रडा" करायला लागणार आणि मग मुन्नाभाईची शिक्षा कमी होणार!

निदान मुंबई मराठी माणासाची आहे अथवा महाराष्ट्राची राजधानी आहे म्हणून का होईना पण मराठी माणूस (कदाचित बाळासाहेब सोडून) या तमाशात सामील होणार नाहीत अशी आशा करतो...

बाकी काय, गांधीजीही म्हणत असतील, " भगतसिंगची शिक्षा योग्य पण संजय दत्तला नको कारण त्याचे एच.पी. (ह्रदयपरीवर्तन) झाले आहे ना!"