पहिल्या दोन प्रश्नपत्रिकांचे प्रश्न बहुपर्यायी असतात व त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी ७५ मिनिटे (सव्वा तास ) असतात तर तिसऱ्या निबंधवजा प्रश्नपत्रिकेसाठी अडीच तास असतात. यात पाच-दहा शब्दांच्या मर्यादेपासून १००० शब्दात उत्तर लिहा अशा प्रकारचे सुमारे २६ प्रश्न असतात. सर्वात मोठा प्रश्न ( १००० शब्दात उत्तर) ४० गुणांचा असतो. त्यालाच वेळ पुरत नाही असा माझा अनुभव  आहे. शिवाय उत्तरे अघळ पघळ वा शब्दबंबाळ असून चालत नाहीत.तर नेमक्या शब्दातच असावी लागतात. (तशी ही चांगलीच गोष्ट आहे. ) फक्त प्रश्नपत्रिका सोडवून पूर्ण होत नाही, एवढेच.

अवधूत.