१००% टक्के सहमत.
ठरवून असेल किंवा योगायोग असेल. बॉम्बस्फोटांचे निकाल आणि श्री. संजय दत्तची गांधीगीरी एकत्र आली आहे.
वरील विधानात योगायोगाचीही शक्यता वर्तविली आहे. परंतु, सध्या दूरदर्शनच्या कुठल्याही वाहिनींवर श्री. संजय दत्तच्या मुलाखती, त्याची एक दिवस संपादक म्हणून नेमणूक आणि त्यात त्याने गांधीगीरी, हृदयपरिवर्तन इत्यादी विषयांवर केलेले भाष्य हा योगायोग नाही. निकाल जाहीर झाले तरी शिक्षा जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे, न्यायाधिशांच्या निकाला नंतर शिक्षा सौम्य व्हावी असा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसतो आहे. अर्थात, न्यायाधीशांच्या मनावर ह्या गोष्टींचा परीणाम होण्या इतपत ते 'हलक्या कानाचे' नसावेत असा विश्वासही वाटतो आहे. पण, संबंधितांचे प्रयत्न बाकी उघड-उघड आणि बटबटीत आहेत.
गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत श्री. जेठमलानी (ते श्री. संजय दत्तचे सुरूवातीचे वकील होते नंतर त्यांनी वकीलपत्र सोडले असा माझा अंदाज आहे.) ह्याना श्री. संजय दत्तच्या गुन्ह्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर टाळले (ते उचितही होते) पण जे स्मितहास्य केले आणि 'मी इश्वराला प्रार्थना करतो की श्री. संजय ह्या सर्वातून बाहेर पडावा.' अशा अर्थाचे वाक्य उच्चारले त्यावरून त्यांच्या मनातील श्री. संजय दत्तच्या गुन्ह्याचे वजन आणि शिक्षेची संभाव्यता जाणवली.