४. सध्याचा एकही राजकारणी/समाजसुधारक कोणाचाही अनुकरण न करता स्वतःचे असे वेगळे स्थान का निर्माण करू शकत नाही? सगळेचजण आपला मेंदू कुठल्यातरी चौकटीत बंदिस्त करून ठेवत आहेत असे वाटते का ?
- वाटत नाही. उदा: श्री. मनमोहन सिंग, श्री. अब्दुल कलाम, अण्णा हजारे, प्रामाणिक पोलीस आधीकारी श्री. विश्वास नांगरे पाटील अशी अनेक नावे येतील.
५. क्र. ३ व ४ मधील परिस्थिती कशी बदलता येईल ?
- लोकांनी चांगल्या भावनेने एकत्र येऊन समाजसेवेचे व्रत स्वीकारावे, एखाद्या समाजसेवी संस्थेत काम करावे.
काही नाही तर रोजच्या जीवनात लाच देणे, काळ बाजार, छुपे दारूंचे अड्डे इत्यादी गोष्टी योग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे इत्यादी..
=================================
'गांधीगिरी' हा एका हिंदी चित्रपटाचा प्रभाव आहे. हि लाट काही दिवसांनी उतरणार यात वाद नाही.
मी 'गांधीगिरी' च्या विरोधात अजिबात नाही. पण 'गांधीगिरी' करून सर्व प्रश्न सुटणार नाहीत. आपण गेली कित्येक वर्षे पाकिस्तानाशी वेगवेगळ्या मार्गाने गांधीगिरी करत आलो.
मलमत्तेचे, पैशाचे, लाचखोरी वा इतर वाद हे फार क्वचितच गांधीगिरीने सुटतील असे मला वाटते.
'गांधीगिरी' करून शांततेत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करून पाहण्यास हरकत नाही.
सध्या सावरकरगीरी आणि गांधीगिरी ह्यांची तुलना चालू आहे.
गांधीगिरीने सर्व वाद सुटले असते तर रामायण म्हणा, महाभारत म्हणा झालेच नसते..
समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेच आहे:
"नाठाळाच्या माथी हाणावी काठी"