तुमच्या मुळे सगळे कोल्हापूर नजरे समोर ऊभं झालं! माझ्या वडिलांचे दूकान (कपड्यांचे) देखिल महाद्वार रोड वर पोलिस स्टेशन जवळ होतं कमीत कमी १५-१६ वर्षामागची ही गोष्ट. पंचगंगेच्या जवळच माझी शाळा स्वामी विवेकानंद हायस्कूल.... चाणक्य साहेब सिद्धाळा बागेच्या झोपाळ्यावरुन व घसरगुंडी मुळे लहान पणी किती तरी चड्या फाडल्या व मार देखिल पडला ह्याचा हिशोब नाही !
रंकाळा, रणदिवे काकांचे दिपक आईस्क्रिम ची गाडी, त्या दिपकला टरका टरका म्हणुन दिवसभर त्याला चिडवणारे मित्र मंडळ व त्याचा खास मित्र मी, नेहरु बाग व त्यातील फुले.... मोतीबाग तालिम व त्याच्या पाठी मागे माझी १ली ते ७ वी पर्यंतची शाळा नूतन मराठी, शाळेच्या सहली, ते मित्र-मैत्रिणी, महालक्ष्मी मंदिर... व मंदिराच्या शिखरामध्ये असलेले छोटे खाणी गणेश मंदिर जवळ जाताना वाटणारी अंधाराची भीती, भवानी मंदिर. पतंगासाठी केलेली मारामारी ,कुभार गल्लीमधुन डोक्यावरुन घरी आणलेला गणपती ते त्यांचे ५ दिवस, तो भव्य असा लक्ष्मीसेन जिनमठ, पुराची मंच्छीद्री पहायला जाणाची ओढ..... कामतांचे महाद्वार रोड वरील उपहारगृह... तेथेच जवळ असलेला बिनखांबी गणेश मंदिर.... आपलं दुधाळी मैदान....... छे ते दिवस तो काळ कधीच परत येणार नाही !!!! वा वा एकदमच लहान पण समोर आलं !!!!