"हा कर कशासाठी आकारला जातो तेच मला कळलेलं नाहीये आजतायागात. म्हणजे घर घ्यायचं आम्ही, कर्ज घ्यायचं आम्ही, हप्ते भरायचे आम्ही, फर्निचर घ्यायचं आम्ही आणि हे शहाणे त्यावर कर घेणार. हे पाणी देणार नाहीत, चांगले रस्ते देणार नाहीत, रस्त्यांवर रस्तेच नाहीत म्हणून दिवे देणार नाहीत, सक्षम सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था देणार नाहीत, माजलेल्या बिल्डर्सविरुद्ध कायदेशीर आणि चटकन संरक्षण देणार नाहीत, भ्रष्टाचारविरहीत शासन यंत्रणा देणार नाहीत, घरांची सुरक्षा देणार नाहीत आणि मोजून कर मात्र घेणार पगारदारांकडून!! अजब आहे सगळं!!!"
- एकदम बरोबर.