आजकाल आपण किती तरी वेळा तक्रार करतो की माणसाची सामाजिक बांधिलकी कमी होत आहे. बरेचसे सण हे लोकांना एकत्र आणण्याचा, चार-चौघात मिसळण्याचा एक सोपा उपाय म्हणून सुरु झाले असावेत.यातूनच आपली स्वतःची संस्कृती निर्माण झाली आहे. मला मान्य आहे की एखाद्याने धर्मांध असू नये.आणि कुठ्ल्या ही गोष्टीची अतिशयोक्ती अयोग्यच. परंतु या वरील प्रसंगामधे मुलाचा उध्धटपणा दिसतो, त्याचा समंजसपणा नाही. आणि कदाचित ८-९ वर्षाच्या मुलाला तेव्हढे समजतही नसावे. पण चुका दुरुस्त करण्यासाठी हेच योग्य वय आहे.
मी ही फारसे देव-देव करत नाही पण शेजारच्या काकू प्रसादासाठी या म्हणाल्या तर त्यांना उध्धटपणे नाकारत नाही.
-अनामिका.