वर्णनात काही इंग्रजी शब्द टाळता आले असते पण  ते मराठी प्रतिशब्दांपेक्षा अधिक प्रचलित आहेत म्हणून आपण वापरले असतील असे वाटते. आपले भाषाप्रभुत्व पाहाता आपल्याला सर्व मराठी शब्द उपयोगात आणणे अवघड नाही.
एखाददुसऱ्या ठिकाणी इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द शोधायचा आळस केला आहे हे खरे;  पण इतर ठिकाणी इंग्रजी शब्द तसेच  ठेवलेत कारण ते प्रचलित आहेत. अशा शब्दांना मराठी शब्द वापरले तर लेखन बोजड होईल असे मला वाटले.