आपले नाव चुकिचे लिहिल्याबद्दल क्षमस्व. आपला लेख आवडला ... त्यावर माझ्या मनात आलेली ती उत्स्फ़ुर्त प्रतिक्रिया होती (संदर्भ : देव खलाश्यांचे भले करो.)

असो आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय .

आदिती असे म्हणणाऱ्यांसाठी काय दुवा मागायचा देवाकडे?(आदिती म्हटल्याने अर्थाचा अनर्थ होतो...)

चुक अक्षम्य आहे खरी पण अदिती आणी आदिती मधला फ़रक कळाला तर पामराच्या ज्ञानात अमुल्य भर पडेल.

आणि माझे भले कशासाठी चिंतताय आपण हेही जरा सांगा मला.

हे बरं काय ? कुणाचे भले चिंतणे वाईट आहे का ? आणी हो मी फ़क्त तुमचेच नव्हे तर विश्वाचे भले चिंततो, तेव्हा पुन्हा एकदा सांगतो गैरसमज नसावा.

कंसमामांचा त्रास झालेल्यांनी उदार अंतःकरणाने क्षमा करावी.
मला हे सारं लिहिताना खूप मजा वाटली. ती सगळ्यांना तशीच वाटावी अशी अपेक्षा मुळीच नाही.
माझं लेखन आवडो न आवडो पण माझं नाव चुकीच्या पद्धतीने लिहू किंवा उच्चारू नये ही मात्र कळकळीची विनंती आहे.

असो यावर काही लिहावे वाटत नाही.