गुलामगिरी , स्वातंत्र्य, या शब्दांवरून खूप वर्षांपूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवली ती अशी
एकदा विनोबा भावे यांच्याकडे आलेला एक मनुष्य आपला नेता कुठल्याही
वैचारिक गुलामगिरीपासून कसा मुक्त आहे हे भारावून जाऊन सांगत होता. त्यावर
विनोबा भावे गमतीने म्हणाले होते, "याचा अर्थ तो स्वातंत्र्याच्या
कल्पनेचा गुलाम आहे".