मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. कुठल्या गाण्यात कुणी कुठला मध्यम की पंचम किती सुरेख लावला आणि कुठली मींड किती लांबवली हे मला कळत नाही. तासाच्या हिशेबावर राग शिकणारे विद्यार्थी आणि गुरुचे तंबोरे उचलून आणि पिकदाण्या साफ करून धन्य झालेले शागिर्द यात बरेवाईट कोण ते मला सांगता येणार नाही.

वा!! रावसाहेब प्रकटन फारच आवडलं.

'याच्याशी मी बोललो, यांनी मला त्यांच्या गाडीतून फिरवले, यांच्या मी घरी गेलो' असं वारंवार सांगून मला काय साधले असते, याविषयी मी साशंक आहे.

आपले अनुभव रुजू करण्यापर्यंत ठीक आहे. पण ह्या तथाकथित रसिकाग्रण्यांचं खाण्यापेक्षा खाजवणंच जास्त, असा माझा एकंदर अनुभव आहे. असो. अण्णांच्या गाण्याएवढा आनंद घरासमोरून जाणाऱ्या एखाद्या आंधळ्या भिकाऱ्याचं किनऱ्या आवाजातलं भजन देऊ शकतं, हेदेखील मी अनुभवलं आहे.

असो.

चित्तरंजन

बद्धकोष्ठी शेरे देणाऱ्यांसाठी
हे प्रकटन बद्धकोष्ठी शेरे देणाऱ्यांनी कायमचूर्णासारखं नियमित घेतल्यास त्यांना फायदा होऊ शकेल. त्यांनी ह्या प्रकटनाच्या  दहा प्रती काढून, त्या जाळून घ्यावात आणि चूर्ण करावे. किमान आठवडाभर हे चूर्ण त्यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ असे घ्यावे. ह्या दरम्याने कुठलेही संगीत वर्ज्य आहे.