दीक्षाभूमी हे अखिल भारतातील दलित बांधवांच एकत्रित येण्याचं ठिकाण आहे.या ठिकाणी एकदा फक्त पाहण्यासाठीतरी या की बाबासाहेबांच्या सोबत ज्या समाजानं धर्मांतर केलं त्या समाजाचा किती कायापलट झालाय. ज्या समाजानं गेल्या फक्त ५० वर्षांपुर्वीपर्यंत जोहार करण्यात आपली जिंदगी वाया घालवली त्यांच्यावर चढलेलं स्वाभिमानाचं तेज पहा एकदा. किती वेगवेगळ्या क्षेत्रात या समाजानं किती प्रगती केली ते आपल्याही डोळ्यांखालून जाऊ द्या एकदा.गीत-संगीत,कविता,नाटके,तत्त्वज्ञान, प्रशासकीय सेवा या क्षेत्रातली प्रगती पहा. या सर्वांची त्यांच्या ५० वर्षांच्या स्थितीशी तुलना करा.
अन् मग तुलना करा कुणबी,तेली माळी सुतार लोहार न्हावी या आमच्या समाजबांधवांच्या आजच्या अन् ५० वर्षंपुर्वीच्या स्थितीची! काडीचाही फरक पडलेला नाही.
यात धर्मांतराचा काहीच वाटा नसावा काय?