कोंबड्याच्या कुजकट ओरडण्याला प्रतिसाद देण्याची तशी काही गरज नाही.पण नागपुरच्या हवेकडेही न फिरकलेल्या या वात कुक्कुटाच्या कोकलण्याने इतर मनोगतींच्या मनात भ्रम निर्माण होऊ नये म्हणून....

दीक्षाभूमीवरची गर्दी ओसरून पुरते २४ तासही झाले नाहीत, वातावरण इतकं स्वच्छ आहे की  इथं काही तासांअगोदर लाखो लोक एकत्रित झाले होते हे सांगुनही पटणार नाही. या स्वच्छ्तेत नागपूर महानगरपालिकेचा मोठा वाटा असला तरी मुळात एवढी गर्दी असतांनाही फारशी अस्वच्छता नव्हती. नैसर्गिक क्रियांची थोडीशी अडचण तर होतीच पण त्यासाठी महानगरपालिकेची फिरती शौचालये होती. 

आता  सध्या घाणीचा मागमुसही नाही. सगळीकडे डासनाशक औषधांचा मारा केला गेलाय.
पण वातकुक्कुट म्हणतात ती घाण केवळ त्यांच्या  दृष्टीचा दोष असल्यामुळे त्याबाबतीत मी काहीसुद्धा करू शकत नाही.