अनुप्रिता, छानच आहे गोष्ट.

याच धरतीवरची आणखीन एक गोष्ट नुकतीच वाचनात आली.

एक सॉफ्टवेअर इंजिनिअर ( त्याचं नाव 'सोमेश' असं गृहित धरूया. ) मायदेशी जाऊन आईची तब्ब्येत ठीक नाही म्हणून तिची काळजी घ्यायच्या निमित्ताने म्हणून विमानतळावर जाऊन पोहोचलेला असतो. सगळ्या फॉर्मॅलिटीज पार करून विमानाची वाट बघत बसलेला असताना वेळ जाईना म्हणता तो तिथेच असलेल्या एका वजनयंत्राकडे जातो. त्यावर उभं राहून नाणे यंत्रात सरकवतो. वजन छापलेलं चिठोरं बघून तो जबरदस्त विस्मयचकित होतो कारण त्यावर छापलेलं असतं.. "शुभप्रभात सोमेश. आपलं वजन आहे ५० किलो. आपला विमानप्रवास सुखकर होवो." बाकी सगळा छापील मजकूर आहे असं धरलं तरी माझ्यासारख्या एका यात्रेकरूचं नाव या यंत्राला कसं कळलं याचा उलगडा त्याला होत नाही आणि तो खूप आश्चर्यचकित होतो. त्याच विमानतळावरील दुसऱ्या बाजूच्या वजनयंत्राकडे जाऊन तिथे तो नाणे टाकून वजन करून बघतो. तिथे निघालेल्या चिठोऱ्यावर लिहिलेलं असतं. "सोमेश, अजुनही आपलं वजन ५० किलो आहे. आपला विमानप्रवास सुखकर होवो." आता तो जाम आश्चर्यचकित होतो. तिथल्या कर्मचाऱ्यांशी तो याबद्दल चौकशी करतो, या यंत्रांना कुठली आयएन प्रणाली जोडलेली आहे का? विचारतो पण तसं काही केलेलं नसल्याचं त्याला समजतं. यामागे नक्की काय कार्यरत आहे याचा छडा लावायचाच या उद्देशाने तो आणिक ३-४ यंत्रं ट्राय मारून बघतो. सर्वात शेवटच्या प्रयत्नात निघालेल्या चिठोऱ्यावर लिहिलेलं होतं,"शुभमध्यान्ह सोमेश, इतक्यांदा प्रयत्न करूनही आपले वजन बदलणार नाही आहे आणि ते अजुनही ५०च किलो आहे. आपले विमान हुकले असल्याने आपल्या परतीचा प्रवास सुखाचा होवो ! "

तात्पर्य : अग्रक्रम नक्की कशाला द्यायचा हे पक्के ठरवून त्यानुसार पावले उचलल्यास मागाहून पश्चात्ताप करायची वेळ येत नाही.