प्रसाद तुमचे म्हणणे खरे आहे. प्रत्येकाला सगळीच लक्षणे कधीच पूर्णत: असत नाहीत. पहिल्या दहा प्रश्नांची उत्तरे 'हो' अशी आणि दुसऱ्या दहा प्रश्नांची उत्तरे 'नाही' अशी असतील तर प्रत्येकी ५ गुण धरून एकूण १०० गुण होतात. असे पूर्ण १०० गुण मिळविणाऱ्यास अ-प्रकारची वर्तणूक असल्याकारणाने हृदयविकार असण्याची/होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. मग क्रमश: कमी कमी गुण मिळविणाऱ्यांना हृदयविकाराचा असणारा धोकाही तसाच कमी कमी होत जातो. ५० हून जास्त गुण मिळविणाऱ्यांनी हृदयविकारासाठीच्या प्राथमिक तपासण्या अवश्य करवून घ्याव्या.