संजोपराव,  प्रकटन आवडले.

पण मला वाटतं, 'आपल्याला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही' असे आपल्या प्रकटनाला नाव हवे होते.  

याचे कारण आपल्याला अभिप्रेत असा अर्थ खालील वाक्यात सापडतो.

"शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, चित्रपट असा कोणताही भेदभाव न करता कानाला गोड वाटणारं आणि थेट हृदयापर्यंत पोचणारं संगीत निखळ आनंद देऊन जातं. मग त्याचे चिकित्सा करता नाही आली तरी चालेल. फणस सोलल्यासारखी कलाकृती सोलून काढायची, गरे फेकून द्यायचे आणि उरलेली गदळ चिवडत कापा चांगला की बरका याची चर्चा करत बसायचं यापेक्षा बाजारात मिळणारे फणसाचे गोड गरे खाणं मला अधिक चांगलं वाटतं. हे बरोबर की चूक ते मला माहिती नाही, कारण  मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही."

आणि त्याचा खरा अर्थ (माझ्या मते)  असा असावा,

' मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही पण तरीही ते मला कां भावतं, का आवडतं, काही कळत नाही. मला आवडणारी गाणी इतरांनाही आवडतात आणि ती का आवडतात तेही त्यांना कळतं, पण मला मात्र शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही  (कि ती मला कां आवडतात??)

प्रसाद