वैदिक काळाच्या शेवटी-शेवटी  (लेटर वेदिक) आर्यांना आपली  कमी-अधिक प्रमाणात पशुपालनावर आधारित (सेमिपास्टोरल असे म्हटले आहे.) जीवनशैली सोडली आणि ते शेती करायला लागले. ह्या नव्या स्थैर्यातून समृद्धी आली. वैश्य हे खरे तर जमीन कसणारेच. द्विज असले तरी त्यांना ब्राह्मणांएवढा किंवा क्षत्रियांएवढा मान मिळत नव्हता. त्यामुळे वैश्यांपैकी अनेक नव्या पंथाकडे वळले. नव्या पंथांत सामील होणाऱ्यांचा रोष क्षत्रियांपेक्षा ब्राह्मणावर अधिक होता.

बौद्ध धर्माला आत्मा-बित्मा मान्य नव्हता ह्याचे कारण चार्वाकाचा प्रभाव. ए. एल. बॅशमच्या 'वंडर दॅट वॉज़ इंड्या' आणि रोमिला थापरच्या 'अशोक एँड दी डिक्लाइन ऑफ़ मौर्याज़' आणि 'हिस्टरी ऑफ़ इंड्या' मधून योग्य माहिती मिळवून देता येईल. बौद्ध धर्मावर चार्वाकाच्या तत्त्वज्ञानांचा आणि उपनिषदांतील विचारांचा कसा प्रभाव पडला, हे देखील सांगता येईल. माझा प्रतिसाद ह्या पुस्तकांवरच आधारित होता.

तीर्थंकर हे क्षत्रिय नव्हते असे मी कुठेच मी म्हटलेले नव्हते. सुरवातीला वैश्यांनी प्रामुख्याने जैन धर्म स्वीकारला. त्यामुळेच आजदेखील तुम्हाला बहुंसंख्य जैन हे वैश्य किंवा व्यापार करणारे आहेत. उत्तर भारतात अजूनही वैश्य जैन आणि हिंदू जैनांत रोटीबेटीचा व्यवहार होतो. आमच्या परिचयातल्या एका अग्रवाल कुटंबीयांपैकी काही मुलं अग्रवाल तर काही मुलं जैन आडनाव घेतात.
(कृपया ऍनी बेज़ंट ह्यांचा  हा लेख वाचावा. दुसरा आणि शेवटचा परिच्छेद हे महत्त्वाचे.)

हिंदू ज्यांनी आपल्याला नाव दिले ते जैन, बुद्ध असा फ़रक अजूनही करित नाहीत.
त्यांना फरक माहीत नाहीत म्हणून ते फरक करू शकत नाही.

असहमत. हे तिनही धर्म एकच आहेत आणि ते हिब्रू पुस्तक तोराह (ओल्ड टेस्ट्यामेंट) वर आधारित आहेत.

आधीच्या प्रतिसादातील 'अहले-किताब'चा अंगुलिनिर्देश ओल्ड टेस्टमेंटकडेच होता. असो. बाकी हे धर्म ह्या एकाच कारणामुळे एक होऊ शकत नाही.  ह्या तिन्ही धर्मांत जेवढ्या समानता आहेत तेवढ्याच किंवा त्यापेक्षा अधिक तीव्र फरक आहेत, असे वाटते.

चित्तरंजन