विरभि,
प्रथम तुम्हाला धन्यवाद!!
एक हा चांगला उत्कंठापूर्ण भाग थोडासा वेळ लावून पाठवलात म्हणून आणि
दोन, पुस्तकाची माहीती पाठवल्याबद्दल !!
दुसरे माझे मत,
आपल्या सर्वांची (म्हणजे निदान माझी तरी होती) अशी धारणा आहे कि, आपल्याला स्वातंत्र्य हे आपल्या महान अहिंसावादी नेत्यांमुळे (म्हणजे प्रमुखत: गांधीजींमुळे) मिळाले. ते जरी खरं असलं तरी इंग्रजांना प्रथम मोठा धक्का या आरमाराच्या / हिंदी सेनेच्या उठावामुळेच मिळाला. याचे प्रमुख कारण म्हणजे सेनाच(म्हणजे हातचं बळच) जर नाहीशी झाली तर राज्यं कोण चालवणार आणि हुकूम कोण मानणार? सेनेच्याच बळावर राज्यं मिळवता येतात आणि टिकवता येतात. (आपल्या शेजारच्या देशात बघितले तरी पुरे.)
या आणि अश्या प्रकारच्या पुस्तकांमुळेच आपल्याला खरा इतिहास कळतो आणि कल्पना स्पष्ट होतात!!
प्रसाद
प्रसाद