वैश्य हे खरे तर जमीन कसणारेच.
संदर्भ देवू शकाल काय? कारण वैश्य व्यवसाय करणारे ह्या संकल्पनेला हा धक्का आहे. व्यय - विक्रय- विनिमय - व्यवसाय - वैश्य - वाण - वाणिज्य - वाणी अशी शब्दोत्त्पत्ती आहे. तसेच शेती शब्दाची उत्पत्ती क्षेत्र-क्षत्रिय-खट्टीय(पाली)-खेत-शेत अशी आहे. क्षत्रियात सबंध भारतात सगळी कडे २ उपविभाग दिसतात; शेती कसणारे व राज्य करणारे. महाराष्ट्रात कुणबी हे शेती करणारे मराठा तर ९६ कुळी व कोकणस्थ मराठा हे राज्यकर्ते.
सुरवातीला वैश्यांनी प्रामुख्याने जैन धर्म स्वीकारला.
संदर्भ दिलात तर बरे होईल.
त्यामुळेच आजदेखील तुम्हाला बहुंसंख्य जैन हे वैश्य किंवा व्यापार करणारे आहेत. उत्तर भारतात अजूनही वैश्य जैन आणि हिंदू जैनांत रोटीबेटीचा व्यवहार होतो.
उत्तर भारता करिताच प्रामुख्यानी हे लागू आहे. महाराष्ट्र आणि दक्षीणेत ही स्थिती नाही (जिकडे जैन बहूसंख्य आहेत.)
आमच्या परिचयातल्या एका अग्रवाल कुटंबीयांपैकी काही मुलं अग्रवाल तर काही मुलं जैन आडनाव घेतात.
अग्रसेनराजाचे हे वंशज (आणि पूजक) मूळ क्षत्रियच आहेत. पण ते हल्ली बहूतांशी व्यावसायिक आहेत हे ही खरे.
हिंदू ज्यांनी आपल्याला नाव दिले ते जैन, बुद्ध असा फ़रक अजूनही करित नाहीत.
त्यांना फरक माहीत नाहीत म्हणून ते फरक करू शकत नाही.
फ़रक हिंदू, जैन, बौद्ध असा नसून, वैदीक, जैन, बौद्ध असा आहे. या तिघांना (व इतर भारतीयांना) "ते" हिंदू मानतात (जे योग्यच आहे) . हिंदू ही भौगोलिक संज्ञा आहे. वैदीक, जैन, बौद्ध ही वेगळी तत्त्वज्ञाने आहेत. आणि हे आपल्याला माहीति असल्याने जैन हे हिंदूंपेक्षा वेगळे असे म्हणू नये. वैदीकांपेक्षा वेगळे असे म्हणणे जास्त सयुक्तिक आणि पटण्यासारखे आहे.
बौद्ध धर्मावर चार्वाकाच्या तत्त्वज्ञानांचा आणि उपनिषदांतील विचारांचा कसा प्रभाव पडला, हे देखील सांगता येईल.
वरिल माहीति मिळाल्यास मी उपकृत होईन, जरुर कळवा.
असहमत. हे तिनही धर्म एकच आहेत आणि ते हिब्रू पुस्तक तोराह (ओल्ड टेस्ट्यामेंट) वर आधारित आहेत.
आधीच्या प्रतिसादातील 'अहले-किताब'चा अंगुलिनिर्देश ओल्ड टेस्टमेंटकडेच होता. असो. बाकी हे धर्म ह्या एकाच कारणामुळे एक होऊ शकत नाही. ह्या तिन्ही धर्मांत जेवढ्या समानता आहेत तेवढ्याच किंवा त्यापेक्षा अधिक तीव्र फरक आहेत, असे वाटते.
आपण मानत नसलो तरी प्रत्यक्ष महंमदानी त्यांना एक म्हणून ठेवल आहे, त्याच्या पूर्वी होवून गेलेल्या प्रेषीतांना मान्यता देवून स्वतःला शेवटचा प्रेषीत घोषित केला आहे. वरकरणी जो फ़रक दिसतो तो 'हदिथ' आधारित न्यायव्यवस्था व आचारसंहीते मुळे आहे. हदिथ हा तोराह, बायबल, कुराण पैकी कुणाचाही भाग नाही. महंमदानी ख्रिस्ती आणि ज्यूंना अल्लाह ला मानणारे,(भटकलेले) स्वधर्मीय म्हटल आहे तर न मानणाऱ्यांना काफ़िर म्हटल आहे. (अधिक माहीति साठी झाकीर नाईक यांच्या विडिओ.गुगल.कॉम वरिल ख्रिस्तां बद्दल च्या चर्चा पहा). आचार संहितेत असला तरी मूळ इस्लामी व ज्यू तत्त्वज्ञानात काही फ़रक नाही.