गोष्टी सगळ्याच चांगल्या आहेत हो पण त्या इंजिनिअरच नाव हिमेश पाहून काहीतरी वेगळंच सुचलं.
तर हिमेश रेशमिया नवोदित असताना एका जुन्या गाण्याच्या लिखिताचे पान घेऊन तळ्याकाठी बसले होते. गाणे होते, 'दो घडी हो तो पास आ बैठे, हम जमानेसे दूर जा बैठे।' या गाण्याची चिरफाड करून रिमिक्स कसं बनवावं याचा विचार करत असताना जोरात वारा आला आणि पान पाण्यात पडलं.
लगोलग यांनाही जलदेवतेची आठवण झाली आणि त्यांनी तिची आराधना सुरू केली. आता त्यांचा तो नाकांतला कर्णबधिर आवाज ऐकून जलदेवता धडपडतच पाण्याबाहेर आली. हिमेश मियांची अडचण कळली तशी पाण्यात जाऊन तिने एक कागद आणला.
त्यावर "आती क्या खंडाला, घूमेंगे फिरेंगे ऐश करेंगे" असं गाणं होतं. हिमेशने सांगितलं हे माझं गाणं नाही काय?
जलदेवतेने पाण्यात सूर मारून दुसरं गाणं काढलं (तेच ते सर्वांच्या लाडक्या मल्लिका शेरावतचे) "कभी मेरे साथ कोई रात गुजार...."
"अर्रर्र! हे नाही ते काय गाणं, माझं गाणं वेगळंच होतं," नाकात रडत हिमेश म्हणाला. आता मात्र जलपरी वैतागली, याची परीक्षा नको आणि ते रडणं नको असं म्हणून तिने सूर मारला आणि मूळ गाणं आणलं, आता त्या बरोबरच वर देणं तिला भाग होतं, म्हणून तिने सांगितलं, "जा वत्सा या तिन्ही गाण्यांची तुला हवी तशी वासलात लाव."
आणि अशा तऱ्हेने हिमेश रेशमिया आपल्या सर्वांच्या गळ्यात पडला.
ह. घ्या.