लेख खूप आवडला. तुमच्या सारखीच माझीही अवस्था असल्यामुळे शेवट मनाला भिडला.केरळ वगळता पुष्कळसा दक्षिण भारत बघून झाला आहे. लेख वाचून केरळभेटीची इच्छा प्रबळ झाली.
      'दोडे दोडे' वरून मलाही एक किस्सा आठवला. एकदा मैत्रीणींसह खरेदीला गेले होते. दुकानातले सगळे विक्रेते मल्याळी होते. माझ्या मैत्रिणीने एकाकडे प्यायला पाणी मागितले. तेंव्हा तो म्हणाला,"ब्रिज नहीं है" काही न कळल्यामुळे तिने पुन्हा विचारले,"पीने के लिये पानी मिलेगा?" त्यावर तो म्हणाला," ब्रिज नहीं है, तंडा पानी नहीं मिलेगा"
      मैत्रीण म्हणाली," फ्रिजका पानी नहीं होगा तो भी चलेगा."तेंव्हा त्याने कुण्या पालकृष्णाला हाक मारून पाणी आणायला सांगितले. फ्रिजला ब्रिज आणि बालकृष्णाला पालकृष्ण म्हणण्यामागचे लॉजिक मला समजले नाही.