धर्मांतर केल्याने अथवा कुणबी,तेली माळी सुतार लोहार न्हावी ह्याजागी शिवधर्म लावल्याने अथवा दिक्षा घेतल्याने त्यांच्या आयुष्यामध्ये किती फरक पडेल ?
तुम्ही म्हणता तसेच समजु की त्यांच्या तेजा मध्ये अमुलाग्र बद्दल होईल पण जिवनाचं काय ? त्यांच्या जिवनामध्ये काय फरक पडेल, त्यांच्या सामाजिक राहणीमानावर / सामाजिक अस्तित्वावर काय फरक पडेल?
तुमच्या ज्या नवीन धर्माची आपण येथे चर्चा करीत आहोत त्या धर्माचे मुळ सिद्धांत काय आहेत, ह्यांची दिशा काय ? हा जर मी धर्मपरिवर्तित केले तर माझ्या आयुष्यामध्ये काय बद्दल होईल ?
उत्तरे अपेक्षित आहेत. पण गुळमिळीत नको. ठोस उत्तर द्या. तुमच्या नेत्याने काय सांगीतले हे मला वाचायचे नाही आहे तुम्हाला काय सांगायचे आहे ते लिहा अथवा त्या कार्यक्रमामध्ये १० लाख लोक आले होते अथवा एकदम स्वर्गाचा आभास होत होता असे ही नको आहे फक्त तुम्ही तुमचे विचार, तुमच्या धर्माचे तत्त्व, दिशा, उद्देश ह्या वर प्रकाश टाका.
विनंती:-- भाषा हे माध्यम आहे तेव्हा त्याचा वापर योग्य असाच करा, कुणाचे मन दुखेल असा अथवा सामान्य नियमाला धरुन नसलेले शब्द वापरु नका.
शनी