शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, चित्रपट असा कोणताही भेदभाव न करता कानाला गोड वाटणारं आणि थेट हृदयापर्यंत पोचणारं संगीत निखळ आनंद देऊन जातं. मग त्याचे चिकित्सा करता नाही आली तरी चालेल.

सहमत.

फणस सोलल्यासारखी कलाकृती सोलून काढायची, गरे फेकून द्यायचे आणि उरलेली गदळ चिवडत कापा चांगला की बरका याची चर्चा करत बसायचं यापेक्षा बाजारात मिळणारे फणसाचे गोड गरे खाणं मला अधिक चांगलं वाटतं.

गदळ चिवडणे, निव्वळ चर्चा करणे हे देखील छंद असू शकतात. त्यांना अयोग्य ठरवता येणार नाही. संगीताप्रमाणेच ही देखील करमणुकीची साधने आहेत झालं.