अरे वा वा.
मी सुद्धा अनेक दिवस अशाच कोठल्या तरी जोखडाच्या शोधात होतो की ज्यात आडकले जाता मला भरपूर स्वातंत्र्य मिळेल. आपण मला नवी दिशा दाखवलीत. आता मी रोज उच्चरवाने आरवू शकेन.
माझ्या स्नेह्याने आपला लेख वाचला अणि तो हसतच सुटला. त्याने मला काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरे मी देऊ शकलो नाही. आपण द्याल अशी आशा आहे.
प्रश्न १) वारा वाहील ती दिशा आपण दाखवता का वारा जिकडे वाहील तिकडे आपण तोंड करता? असा भयानक गहन प्रश्न त्याने मला विचारला आणि माझी मती गुंग झाली. आपण याचे उत्तर देऊन माझ्या स्नेह्याचा आवाज बंद करावा.
प्तश्न २) तत्त्व १ मध्ये आपण सर्व कोंबड्यांना प्रवेश म्हट्ले आणि लगेच तत्त्व २ मध्ये काहींना प्रवेश नाकारलात असे का? म्हणजे आपल्यात सुसंबद्धाता नाही असा अरोप तो करत होता.
प्रश्न ३) काही कोंबडे (म्हणजे देशी बरं) कुकुऽऽचकू असे आरवतात तर काही कुकूडूरकूऽऽऽ असे आरवतात (म्हणजे हिंदी भाषीक कोंबडे बहुतकरून) तसेच विलायतेला जाऊन आलेले अथवा तेथेच राहणारे, कॉक अ डुडल डू ऽऽऽ असे आरवतात. मग यातले ग्राह्य आरवणे कोठले. याचे नियम काय आहेत.
आपल्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत,
--लिखाळ.