नमस्कार,

१९९३ साली नाही पण नंतर सुमारे दिड-एक वर्षे संजय दत्त पोटोखाली अटकेत होता. राज्यात युतीचे आणि देशात रालोआचे सरकार होते. त्यावेळेस ठाकऱ्यांनी संजयदत्तला सुटण्यासाठी मदत केली.

सुनील दत्तचे राजकारण जरी मला कधी आवडले नसले तरी तो गेल्यावर जे काही वाचनात आले, त्याप्रमाणे तो माणूस म्हणून खूप चांगला होता आणि त्याचे सर्वांशी चांगले आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. जसे महाजनांचे शबाना दांपत्याशी होते तसे त्याचे ठाकऱ्यांशी होते...(परस्परविरोधी व्यक्तिमत्वांचे आणि विचारांचे मित्र!)

वडीलांच्या त्या पुण्याईचा फायदा संजयदत्तला झाला, असे वाटते. परीणामी सुनीलदत्त कधी शिवसेनेबद्दल उलट सुलट बोलला नाही असे वाटतयं.