शिवश्रीजी,

आपले म्हणणे घटकाभर खरे धरून चाललो तरी मला पडलेले काही प्रश्न :

१) जे ५० वर्षांपूर्वी नवबौध्ध झाले होते त्यांच्या जीवनरहाणीत फरक पडला असे मानले तर, पुढे जाउन त्यांनी किती जणांना मदत केली  आणि ते वरती आले?

२) जे त्यावेळेला धर्म बदलल्यामुळे सुधारले, त्यांची सर्वार्थाने प्रगति झाली असेल, तर त्यापैकी पुष्कळ जणांना समाजाने, सरकारने सवलती देऊन, या ना त्या मार्गाने मदत केली असेल. या मदतीमुळेच ते मोठे झाले. आणि अर्थात यात गैर काहीच नाही.  

या मदतीपैकी किती मदत ते नवबौद्ध झाले म्हणून मिळाली आणि कोणाकडून ? याच्या उत्तरात आपल्याला अशी दिशा मिळू शकेल कि या सवलती एखाद्याने बौद्ध धर्म स्विकारला कि मिळू शकतील. (मग तो पूर्वाश्रमीचा कोणत्याही जातीचा का असेना).

हे माझे विधान थोडेसे धाडसी आहे, पण या वर अनेक आपल्यासारख्या जाणत्या लोकांची मते आवश्यक आहेत. पण हे जर खरे असेल, तर मग हाच त्यांचा यशाचा खरा मार्ग ठरतो नाही का?  आणि मग असे असेल तर हा गुरू मंत्र हे पुढारलेले लोकं बाकीच्या तळातल्या (आणि निश्चितच गाळातल्या) आपल्याच लोकांना कां सांगत नाहीत ? हा प्रश्न स्वाभाविक आहे कारण पुढारलेल्या अनेक लोकांचे अनेक नातेवाइक (अगदी जवळचे सुद्धा) तसेच दिनावस्थेत दिसतात.

२) अश्या प्रकारच्या सवलती, मदती सरकार दफ्तरी तरी,  हिंदू धर्मातल्या

अनुसूचित जाती, जमाती यांच्यासाठीसुद्धा लागू आहेत. मग धर्म न बदलता या

सवलती मिळू शकणार नाहीत का? नसतील तर काय काय कारणं  असू शकतील ? या वरून आपल्याला हे कळू शकेल कि नेमका कुठे उपचार कमी पडतोय. याचा अर्थ असा पण असू शकतो कि सरकार नुसतीच कागदोपत्री चर्चा करते, पण बाकी काहीच नाही.

३) आता आपण समाजाचे जे देणं लागतो त्या विषयी - ज्या लोकांचा विकास झाला आहे, त्या लोकांनी त्यांना मिळालेल्या सवलती, मदत हे  आपल्यावर असलेलं हे  पूजनीय बाबासाहेबांचे कर्ज आहे असं मानायला नको कां?  आणि जर असं असेल तर त्याची परतफेड ते कशी करतात ? पूजनीय बाबासाहेबांना स्वाभिमानी, सुशिक्षित अश्या समाजाची अपेक्षा होती. त्यांचा मार्ग स्विकारायचा म्हणजे हे कर्ज फेडायला हवं आणि नवीन कर्ज घ्यायला नको. हा मार्ग म्हणजे विकसीत लोकांनी कोणतीही सवलत न घेणे आणि त्याबरोबरच ज्यांना या सवलतींची गरज आहे त्यांच्यासाठी त्या सोडणे. यामुळेच आपण बाकीच्या समाजाच्या बरोबरीला येउ शकू, त्यांच्यात मान मिळवू शकू. ( अवांतर: मला सांगायला आनंद होतो कि माझा असा एक मित्र आहे, पण तो बाकीच्यांच्यासाठी मुर्ख ठरलाय, नशिबात असलेलं सोडलं म्हणून). या आणि अश्या कल्पनांना किती लोकांनी आचरणात आणलयं? आणि जर तसं असेल तर हे लोकं पुढे येऊन अश्या प्रकारच्या स्वभिमानी लोकांचा एक दबाव गट तयार का करत नाहीत कि ज्यामुळे सवलती नाकारणारे लोक सुद्धा या समाजात आहेत असे चित्र निर्माण होईल.  ? यामुळे सरकारला पण या सवलती दिल्या त्याचे परिणाम दिसतील आणि बाकीच्या समाजाकडून पण प्रशंसा मिळेल.

असे अजून पुष्कळ मुद्दे आहेत,  हळू हळू सर्व चर्चा करू.

उत्तराच्या प्रतीक्षेत ,

प्रसाद.