मुळात गांधी हुतात्मा भगतसिंग यांचा अत्यंत तिरस्कार व द्वेष करत होते.
गांधींशी वैयक्तिक दुश्मनी असल्यासारखे कसे काय लिहू शकते कोणी? (गांधीच काय कुठल्याही इतिहासपुरुषाबद्दल असे लिहू नये, असे वाटते) संयत शब्दांत, वस्तुनिष्ठपणे आणि निःपक्षपातीपणे भावनांचा कुठलाही मुलामा न चढवता सर्व तथ्ये (सत्य नाही, प्रत्येकाचे सत्य वेगळे) वाचकांपुढे मांडावीत. कथिल आणि सोने त्यांना ठरवू द्यावे.
चित्तरंजन
अवांतर
व्यक्ती सोडल्यास साधारणतः इतिहासलेखनात व्यक्तीच्या नावाआधी त्याची पदवी किंवा बिरुद टाळतात. अत्यंत तुरळक अपवाद सोडल्यास. इतिहासात 'बाजीरावाने तह केला', 'शिवाजीने म्हटले', 'राणा प्रतापाने हार मानली नाही', 'अकबराच्या दरबारात बिरबल होता' असेच इतिहासपुरुषांचे एकेरी उल्लेख आढळतात. पण अर्वाचीन काळातील लोकांचे उल्लेख मात्र सहसा एकेरी नसतात.