आपल्याकडे "लबाडीशिवाय धंदा होऊच शकत नाही" व "व्यापारांत लबाडी समर्थनीय आहे" अशी व्यापारी वर्गाचीच नव्हे तर सर्वसामान्यांचीही धारणा आहे. त्यामुळे धंदा करतांना लाचलुचपतींत काही गैर आहे असे कोणालाच वाटत नाही.धंदा म्हणजे सेवेच्या बदल्यांत पैसा मिळवणे असा अर्थ राहिला नसून कसेही करून पैसा मिळ्वणे असा अर्थ झाला आहे. भ्रष्टाचार हा या विचारसरणीचा परिणाम आहे.