सर्वांना प्रामाणिकपणे वागावे लागेल! सुरवारत कोणी करायची ते ठरवा. भ्रष्टाचाराविरूद्ध लढा द्यायचाय तर मग राजकारणात अथवा बाबूगिरीत (अजून एक "गिरी"!) नसलेल्या माणसांना काही गोष्टी करण्याची तयारी करावी लागेल:

  1. लाच देणार नाही - घेणार नाही
    1. मग ती सरकारी माणसाला असो, अथवा
    2. मुलांच्या शाळा कॉलेजासाठी असो
    3. पोलीसाला असो
    4. वगैरे
  2. नागरीक शास्त्र परत शिकीन आणि मुलांना शिकवीन. - आपण इभूना मधील "ना", ना धड शिकतो ना धड वापरतो.
  3. सविनय कायदेभंग करायचे सोडून द्या!

आपले लोक भारताबाहेर असले की बऱ्यापैकी नियम पाळून राहातात. पण तेच भारतात आले की परत मूळ पदावर. सर्वांना चांगल्यासाठी बदलावे लागेल.

पण त्याच वेळेस हे ही लक्षात ठेवा की:

  1. स्विझर्लंड लहान देश आहे, कमी लोकसंख्या आणि जगातील बेकायदा पैसे कायदेशिर ठेवण्याची व्यवस्था असलेला देश - तो भ्रष्टाचार नाही का?
  2. एन्रॉन जेंव्हा भारतात येते, पवार, ठाकरे, महाजन, मुंढे, राव, वाजपेयी या सर्वांना भेटते, खिसे गरम करते, तेंव्हा काय होते?
  3. इस्ट इंडीया कंपनीने भारतात येऊन काय केले होते?
  4. ...

तात्पर्य: आपल्यात जे काही चूक आहे ते नक्कीच चूक आहे आणि त्यासाठी बदल होणे महत्त्वाचे आहे. कायद्याचे कडक पालन होणे ही महत्त्वाचे आहे. पण असल्या अहवाल हे फक्त डार्विनच्या सिद्धांतातला "स्ट्रगल फ़ॉर एक्झिस्टंस" दाखवते आहे.