श्री. मिलिंद,

सर्वसाक्षी यांनी "हुतात्मा भगतसिंग आणि गांधी - ४" असे शीर्षक जाणून बजून दिले आहे.  यांत एका दगडांत अनेक पक्षी मारले आहेत.

  1. "गांधीजी आणि भगतसिंग" या मालिकेला उत्तर देणे
  2. भगतसिंगांच्या पहिल्या मालिकेत गाळलेल्या हुतात्मा या पदाची जाणीव करून देणे.
  3. गांधीजी ऐवजी गांधी असे लिहून तसेच त्यांचे नाव दुसऱ्या स्थानावर ठेवून कोणाबद्दल किती आदर आहे हे स्पष्ट करणे.
  4. आपल्या लेखाचे शीर्षक तुमच्या लेखमालिकेशी संबधीत आहे हे आणि तुमच्या वरचढ आहे हे दर्शविणे.

एकंदर श्री. सर्वसाक्षींनी अतिशय चतुरतेने तुम्हाला प्रत्युत्तर दिले आहे.  आता खेळी तुमची आहे.

अर्थात हे तुम्हाला समजले नसेल असे मुळीच नाही.

"समजा उद्या मी 'हॅरी पॉटर अँड प्रिन्सेस ऑफ अझाबाकान' असे पुस्तक लिहिले तर चालेल का?"

तुम्ही त्याच नावाचे पुस्तक लिहिणे अयोग्य आणि अवैध आहे.  पण तुम्ही कदाचित हरी पीटर असे पात्र/पुस्तक लिहू शकता.  पण त्याच बरोबर लेखन चौर्याच्या खटल्याला सामोरे जायची तयारी तुम्हाला ठेवायला लागेल.

कलोअ,
सुभाष

अवांतर - आपल्याला Naked Gun 1 1/2  हे रॉकी १, २, ३, वगैरे सारख्या मालिकांचे विडंबन करणारे चित्रपट माहिती असतीलच.