ही चर्चा हे एक स्वसंभाषण आहे हे उघडच आहे. पण आपल्या मते मुक्तक म्हणजे मुक्त चिंतन असले तरी मुक्तक हा एक स्वतंत्र काव्य प्रकार आहे. मुक्तके ही प्रकटनासारखी गद्य नसून ती छंदबद्ध असतात. मनोगतावर आपल्याला काही मुक्तके मिळतील. आपल्याला जीएं ऐवजी दुसरेच कोणी काजळमाया किंवा पारवाचे लेखक आहेत असे म्हटले तर कसे होईल तसेच आम्हाला ह्या चर्चेला मुक्तक म्हटल्यावर आम्हाला वाटले. (जीएं चे उदाहरण केवळ आपल्याला समजायला सोपे जावे म्हणून.)