संपदा,
आपल्या उत्तरात उपरोधाचा, किंचीत रागाचा सूर कां आहे ते कळले नाही.
१) साडेसात वृत्तात बसत नाही म्हणून सात घातलय.
---- म्हणूनच 'सात' चा संदर्भ विचारला.
२) साडेसातचा संदर्भ लागत नसेल तर दाते पंचांगवाले दाते, कालनिर्णयवाले साळगावकर नाहीतर आपले शरद उपाध्ये यांच्याशी तडक आणि त्वरित संपर्क साधा.
'साडेसात' हा शब्द्च जर आपल्या कवितेत नाही तर कवीला 'सात' म्हणजे 'साडेसाती' अभिप्रेत आहे हे वाचकाला कसे कळणार? त्यामुळे 'दाते पंचांगवाले दाते, कालनिर्णयवाले साळगावकर नाहीतर आपले शरद उपाध्ये' यांना संपर्क करण्याचा आपला सल्ला अनाठायी व अयोग्य आहे.
३) बाकी लग्नानंतर सात वर्षांनी काय होतं हे मी पाहिलेलं नाही. (हे नक्की काय असतं ते कळावं म्हणून तुमचा स्वतःचा एक फोटो इथे चिकटवू शकाल का म्हणजे संदर्भासहित स्पष्टीकरण (सुफळ) संपूर्ण होईल. )
मी विनम्रपणे सांगू इच्छितो की वरील शेरेबाजी ही 'औधत्यपूर्ण' आहे.पण मी त्याचा राग न मानणार नाही!मी जे काही लिहिले ते आपण समजून न घेता भावनेच्या भरात वरील शेरेबाजी केली आहे.
हल्लीच्या विशेषत: नवीन,आधुनिक कवींच्या काव्यात अनेक पाश्च्यात्य संकल्पना उल्लेख वा संदर्भ असतात(उदा: ब्रेकऑफ, ७ यीयर इच वगैरे). मी आपली कविता वाचतांना मला 'सात' वरून आपल्याला ७ यीयर..वगैरे काही सुचवावयाचे आहे असे वाटले ,त्याची खातरजमा करून घेण्यासाठी, मी आपल्याला वाचक म्हणून तसे मोकळे पणानी विचारले. त्यावर आपण 'होय वा नाही' असे उत्तर देऊ शकला असता.पण आपण दुर्दैवाने त्याचा विपर्यास करून 'ते फोटो'वगैरे जो वैय्यक्तिक उपदेश केला आहे ते अनाकलनीय व 'औधत्यपूर्ण' आहेच तसेच म्हणून निषेधार्यही आहे. असो.
आपल्या यापुढील लिखाणाला (ते समजो अगर न समजो) मी प्रतिसाद देण्याचे औधत्य करणार नाही.
पुढील लेखनाबद्दल शुभेच्छा!
जयन्ता५२