नाही जाणवला विनोद. दारुड्याच्या किश्श्यात तर अजिबातच नाही. त्रास झाला अश्याने की एखाद्या माणसाचं हेही आयुष्य असू शकतं!!!
बाकी वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे.. आपल्या जवळच्या माणसाच्या ओकाऱ्या ऐकणे हा एक भयंकर अनुभव असतो. त्या व्यक्तीला अपरिमित त्रास होताना आपण बघत असतो आणि तो त्रास कमी करायला काहीही मदत करू शकत नाही.
हे इथे लिहावं की नाही हे म्हणायला मनोगत म्हणजे माझ्या घरची जहागिरी नाही आणि मला झापड लावून घेण्यातही रस नाही. पण यात काहीही विनोद नाही आणि दुसऱ्याला होणाऱ्या या त्रासामधे विनोद शोधण्याची कल्पना मी तरी करू शकत नाही.