चारोळी म्हणजे मुक्तकच. चंद्रशेखर गोखलेंनी त्यांच्या मुक्तकला चारोळ्या म्हटले एवढेच. मुक्तकात चार ओळी असतात पण मुक्तकाला वृत्ताचे बंधन नसते. रुबाई, कता हे उर्दूतले हे प्रकार मुक्तकच. ही छंदातली मुक्तके. 'रुबाई' काही विशिष्ट वृत्तांतच लिहिली जाते. 'कता'मध्ये मात्र असे बंधन नसते.
रॉय किणीकरांनी ज्या 'रुबाया' लिहिल्या आहेत ते खरे तर 'कता' आहेत.
कळावे.
चित्तरंजन