(उल्लेखित) संगीत व (अनुल्लेखित पण विषयाला धरून) साहित्य, शायरी अशा तितक्याच जिवाला भिडणाऱ्या/झोंबणाऱ्या/सुखावणाऱ्या अनुभूती आणि गदळ निवडणे, निव्वळ चर्चा करणे इ. गोष्टी या दोन्हींना केवळ करमणुकीची साधने म्हणून एकाच पातळीवर आणलेले अयोग्य वाटले. तो व संजोप यांनी तरी असे बोलू नये.
मग माणसाचे जीवन आणि अळीचे जीवन यात काय फरक राहिला? (तसा अंतिमत: तो काहीही नसेलही, पण आपल्याला वाटतो ना)

दुसरे एक: तुम्हा ग़ालिबवाल्यांना थोडे छेडू का? (मी स्वत: तात्पुरता तुमच्याहून वेगळा होऊन, बाजूला, कंसात उभा आहे)
समजा मी म्हटले की सौ. संगीता जोशी - की आणखी कुणाच्या - 
              सारे तसेच आहे
              अन् हाच पेच आहे
अशासारख्या ओळी
किंवा जावेद अख़्तर ची काही चित्रपटगीते (उदा. हल्लीचे "मितवा...")
मला ग़ालिब किंवा साहिर च्या इतक्याच भिडणाऱ्या/री वाटतात तर काय म्हणाल? 
सारांश - मला वाटते की एका बाबतीत नीचभ्रू म्हणवणारे दुसऱ्या बाबतीत स्वत:च उच्चभ्रू बनू शकतात, तेव्हा दुसऱ्यावर टीका कशाला करायची?
ज्याला आपण बुरखा समजतो ती एखादवेळी कातडीसुद्धा असू शकते.
(कुठल्याही कंपूत नसूनही, सगळ्या कंपूंत असणाऱा)
दिगम्भा