पहिला किस्सा वाचल्यानंतर पुढे जाउ शकलो नाही. यामध्ये जर विनोद असेल तर तो बघायला मी असमर्थ आहे. माझ्या मते आपण विनोदबुद्धीला जास्त गंभीरपणे घ्यायला हवे. स्टार, सोनी वरच्या 'तथाकथित' विनोदी मालिका पाहून असेच वाटते.

आणि बाकीचे प्रतिसाद वाचल्यावर एक विनंती. (ही आधीच काही जणांनी केली आहे.)
एखादा विचार, किस्सा, मत वाचून राग, द्वेष यासारख्या तीव्र भावना मनात येणे ही साहजिक  गोष्ट आहे. पण भावना मनात येणे आणि आपण कृती करणे यामध्ये जो वेळ असतो त्या वेळात आपण जी कृती करतो आहोत ती बरोबर आहे किंवा कसे ह्यावर  विचार केला तर बरेचसे भावनिक प्रतिसाद थांबवता येतील. हे वैयक्तिक मत आहे. यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. पटतय का बघा.
हॅम्लेट